बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत जिल्हा परिषदेत मोठी कारवाई केली आहे. पैशांची मागणी केल्याप्रकरणी तांदूळकर आणि खर्चे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका कामाच्या मोबदल्यात किंवा विहित लाभासाठी या दोघांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत तांदूळकर आणि खर्चे यांना ताब्यात घेण्यात आले असून, एसीबीचे पथक अधिक चौकशी करत आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या लाचखोरीच्या प्रकरणामुळे इतर भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.